ठेकेदार व नगरपरिषद चे नाते काय? #gadchandurनगर परिषद ठेकेदारावर इतके मेहरबान कसे?

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर नगर परिषद ची दुसरी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. व गडचांदूर वासीयांनी मोठ्या अपेक्षाने कांग्रेसच्या सौ सविताताई टेकाम थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले. सध्या नगर परिषद वर कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसची सत्ता आहे.
सत्ता स्थापनेला पूर्ण अडीच वर्षे लोटले आहे.शहराचा विकास झपाट्याने होतील. जनतेला योग्य न्याय देतील अशी अपेक्षा होती. परंतु नगराध्यक्षा तथा सत्ताधाऱ्याकडून पूर्णपणे निराशा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरात अंदाजे चार-पाच कोटींची विकास कामे जसे बुऱ्हाण लेआऊट, डोहे लेआऊट, मंदे लेआऊट, गोरे लेआऊट ओपन स्पेस, छयत्रपती शिवाजी महाराज परिसराचे सौंदरीकरण, अग्निशमन गाडी शेड, अनेक ठिकाणचे रोड, नालीचे बांधकाम दोन वर्षा पूर्वी चालू झाले ते अजूनही काम पूर्ण नाही. स न 104 ओपन स्पेसची तर दोन वर्षा पूर्वी उद्घाटन होऊनही कामाला सुरुवात नाही.
 अग्निशमन गाडी करिता शेड बांधकाम मागील एक वर्षा पूर्वी मंजूर होऊनही अजूनही कामाला सुरुवात नाही. सदरची गाडी उघड्यावर असून ती जंग खात आहे. परंतु या कडे सत्ताधाऱ्याचे लक्ष नाही. जेव्हा की कामाचा कार्यदेश देताना नगर परिषद कडून स्पष्ट कालावधी नमूद केला आहे. परंतु कालावधीत काम झाले नसताना सुद्धा त्या ठेकेदाराकडून नियमानुसार कुठलाही दंड वसूल करण्यात येत नाही. जर ठेकेदारा कडून दंड वसूल केला असता न प च्या उत्पन्नात भर पडली असती. परंतु न प च्या उत्पन्नाचा विचार न करता स्वतःचे स्वार्थ साधून ठेकेदाराला मुदत वाढ देण्याचा पराक्रम सत्ताधारी यांनी केला आहे.असा आरोप नगरसेवक डोहे यांनी केला.
मात्र ज्या नागरिकानी भरघोस मताधिक्काने निवडून सत्तेवर बसविले त्यांच्या कर थकबाकी वर 2% दंड आकाण्याचा निर्णय घेतला. अखेर तो निर्णय भाजपाने उधळून लावल्याने जनतेला दिलासा मिळाला. अखेर सत्ताधारी ठेकेदारावर इतके मेहरबान का? असा सवाल गडचांदूर वासीयांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत