इरई धरणाचे ३ दार उघडले! #Irai #dharan #chandrapur

संग्रहित छायाचित्र

चंद्रपूर:- सलग पाचव्या दिवशी पाऊस चालू असल्याने इरई धरणाची पातळी वाढली असल्याने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर द्वारे प्राप्त सूचनेनुसार इरई धरणाचे एकूण ३ दरवाजे २५ सेमी. ने उघडण्यात आले आहे. परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यामुळे धरणांच्या तीन दरवाजांची ओपनिंग २५ सेंटीमीटर ने वाढवण्यात येत आहे.
धरणाची पातळी- २०६.९२५, धरणातील साठा- ८६.६५ टक्के इतका असून धरणातील पाण्याचा विसर्ग- १०१.८९२ क्युमेकने, झाला आहे असाच, पाऊस सतत चालू राहिला तर आणखी काही दरवाजे उघडणार असल्याची माहिती आहे.
जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या शहरातील वडगाव, हवेली गार्डन, नागीनाबाग, महसूल कॉलिनी, रहेमत नगर व झरपट नदी लगतच्यातुळजा भवानी वार्ड, महाकाली वार्ड या परिसरातील रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने