मुंबई:- दोन वर्षापासून नागपूर हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामूळे आता होणार असलेले पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात बोलतांना केली आहे. आज सभागृहाचे विशेष सत्र बोलावत राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सर्व अपक्षांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतांना आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर नगरीत नागपूर करारानुसार दरवर्षी राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन घेतले जाते. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २०२० चे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात आले नाही.
आज राहुल नार्वेकर यांची मतदान प्रक्रियेने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी शुभेच्छा प्रस्तावावर बोलत असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणी केली आहे. तसेच यावेळी बोलतांना त्यांनी सर्व अपक्ष आमदारांच्या वतीने नवनिर्वाचीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी नविन सदस्यांना विषेश प्रशिक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. आता तुम्ही महाराष्ट्राच्या प्रथम स्थानी आहात हे स्थान सर्वसामान्य माणसाच्या हिताचे काम करणार ठराव अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. आणि शहाजी बापू सोबतचा ११-१२ दिवसांचा सहवास राहीला. आणि ते सांगत होते. काय झाडी, काय डोंगर, त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी अस म्हटलं पाहिजे "काय ते इंडीया गेट, काय ती विधानसभा आणि काय ते अध्यक्ष, सगळं ओकेच".... या पध्दतीची भुमिका तुमच्या बाबतीतली गेली पाहिजे. अपक्षांकडे विशेष लक्ष देत त्यांच्या भावना मांडण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यावा असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.