🌄 💻

💻

ॲड. राहूल नार्वेकर यांच्‍या माध्‍यमातुन संसदीय प्रथा, परंपरा जपल्‍या जातील:- आ. सुधीर मुनगंटीवार #chandrapur #Mumbai

नवनिर्वाचित विधानसभा अध्‍यक्षांना दिल्‍या शुभेच्‍छा!
मुंबई:- भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात लोकशाहीच्‍या या मंदिरात ॲड. राहूल नार्वेकर यांच्‍यासारख्‍या कायदेतज्ञाची विधानसभा अध्‍यक्षपदी निवड झाली ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्‍यांच्‍या माध्‍यमातुन या सार्वभौम सभागृहात संसदीय प्रथा, परंपरा जपल्‍या जातील, असा विश्‍वास माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभागृहात व्‍यक्‍त केला.
दिनांक ३ जुलै रोजी विधानसभेत नवनिर्वाचित अध्‍यक्षांच्‍या अभिनंदनपर प्रस्‍तावावर आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. महाराष्‍ट्रातील विविध घटकांच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी, त्‍यांच्‍या इच्‍छा-आकांक्षांची पूर्तता करण्‍यासाठी या सभागृहात आपण चर्चा घडवून आणाल आणि राज्‍यातील शेवटच्‍या व्‍यक्‍तीचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी प्राधान्‍य द्याल अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
या सभागृहातील चर्चा राज्‍यातील १२ कोटी जनता बघत आहे. त्‍यामुळे या सभागृहात संसदीय प्रथा, परंपरांचे पालन होणे आवश्‍यक आहे, असे सांगत दिन, दुर्बलांचे प्रश्‍न सोडविण्‍याकरिता कोणत्‍याही विधानसभा सदस्‍याला थांबवू नका, त्‍यांना बोलू द्या. अधिवेशनाचा कालावधी वाढला तरी चालेल मात्र लोकशाहीचा सन्‍मान वाढेल यासाठी पुढाकार नवनिर्वाचित अध्‍यक्षांनी घ्‍यावा, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करत अध्‍यक्षांच्‍या सन्‍मानार्थ कविता सादर करत आ. मुनगंटीवार यांनी त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत