Click Here...👇👇👇

आरोग्य मित्र हेल्थ कार्ड वितरण व आरोग्य मार्गदर्शन शिबिर संपन्न

Bhairav Diwase
माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्याकडून मारुती मंदिराला साऊंड सिस्टीम  भेट
चंद्रपूर:- दि. ०३ जुलै सकाळी 11 वाजता आरोग्य मित्र हेल्थ कार्ड वितरण व आरोग्य मार्गदर्शन शिबिर नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. माळी समाजाच्या नेत्या सौ. मायाताई मांदाडे यांचा जन्मदिवस व सौ. खांडेकर ताई आशा वर्कर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार  केला.
 याप्रसंगी लहान विद्यार्थ्यांना टी-शर्ट चे वाटप सुद्धा करण्यात आले. श्री वसंतराव धनरे पाटील, नागरीकर काकू, खांडेकर भाऊ, सय्यद भैय्या, श्री पुरुषोत्तम सहारे ,सौ. मंजुश्री कासंगोटूटवार, आनंदराव मंदाडे ,संजू भाऊ कोत्तावार, अमोल भाऊ तंगडपल्लीवार ,कैलास सुरसौत, जगणे भाऊ ,तलमले काका यांनी अथक परिश्रम घेतले.
 
माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या प्रभागातील निमगाव चा मारुती मंदिर येथे  आध्यात्मिक वातावरण निर्मितीसाठी यज्ञाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी साऊंड सिस्टीम मंदिराला भेट दिली.

यावेळी सौ. छायाताई मायकलवर, सौ. रोकडे ताई , मंजुश्री कासनगोटटूवार, पुरुषोत्तम सहारे, सह असंख्य महिलांची उपस्थिती होती. याप्रसंगी सौ उद्धरवार काकू, सौ ठाकरे काकू, सौ कंनाके काकू यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला, मन्ने काकू, लाडेकर काकू ,आंबेकर काकू , पत्रंगे काकू , व्यहाडकर काकू, यांनी परिश्रम घेतले.