Top News

अखेर.....! भाजपाच्या मागणीला यश #Korpana #Gadchandur


कोरपना:- गडचांदूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सविताताई टेकाम,उपाध्यक्ष शरदजी जोगी व सत्ताधाऱ्यांनी मागील वर्षी शहरातील थकबाकी मालमत्ता व पाणी पट्टी कर धारकाकडून प्रति माह 2% शास्ती(दंड) वसुल करण्याचा निर्णय घेतला.तो अत्यन्त चुकीचा होता आधीच कोरोनाने लोकांचे आर्थिक बजेट बिघडले व परत त्यांचेकडून दंड वसुल करण्याचा निर्णय घेऊन त्यांना परत आर्थिक खाईत ढकलण्याचे काम करीत असल्याने तसेच सदरचा निर्णय जनतेला मान्य नसल्याने न प च्या वसुलीत कमालीची घट झाल्याने भाजपा चे नगर परिषद विरोधी नगरसेवक यांनी विरोध केला अनेकदा पत्र व्यवहार करूनही सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करीत होते.
तेव्हा नगर परिषद च्या विरोधात भारतीय जनता पार्टीकडून नगर परिषदवर मोर्चा काढण्यात आला त्यानंतरही सत्ताधारी काहीही ऐकत नसल्याने भारतीय जनता पार्टी च्या वतीने श्री.प्रशांत खाडे दलित आघाडी नेते व बबलू रासेकर यांचे दिनांक 19 मे 2022 रोजी उपोषनाला बसले व 2% दंड रद्द केल्या शिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ताट भूमिका घेतल्याने शेवटी नगर परिषद सत्ताधारी व प्रशासनाने नमता घ्यावे लागले.व उपोषण स्थळी येऊन सदरची मागणी पुढील सभेत घेऊन मान्य करण्यात येतील असे लेखी आश्वासन देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
आज रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली व सदरचा विषय सर्वानु मते मंजूर करण्यात आला. त्याबद्दल नगर परिषदचे विरोधी भाजपाचे नगरसेवक श्री.अरविंद डोहे यांनी सन्माननिय सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.परंतु यापूर्वी काहींनी नगर परिषद मध्ये दंड (शास्ती) भरली त्यांचे काय ? असा प्रश्न डोहे यांनी विचारला असता त्यावर नगराध्यक्ष व इतर सत्ताधारी त्यांना काहीही करता येत नाही.असे उत्तर दिले.व त्यावर मुख्याधिकारी सुद्धा त्याला काहीही करता येणार नाही असे सांगण्यात आले.यापुढे कुणालाही 2% दंड आकारला जाणार नाही असे सभागृहात सांगितले. त्यावर सुद्धा डोहे यांनी हे चुकीचे होईल ज्यांनी दंड न.प. भरला त्यांची दंडाची रक्कम चालू वर्षात जमा करण्याची मागणी केली.परंतु सत्ताधारी यांनी त्याकडे दुर्लक्ष करत ठराव मंजूर करण्यात आला.
डोहे यांना विचारले असता सदरची 2% दंड रद्द करण्याची मागणी माझी आहे व त्यासाठी लढा दिला तसाच ज्या नागरिकांनी 2%दंड भरला त्यांना परत मिळवून देण्याकरिता मी पुढे लढा देऊन गडचांदूर नागरिकांना न्याय देण्याचे काम करू असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने