गर्भवतीचा वेदनादायी प्रवास : २ तासांच्या प्रवासाला लागले ७ तास #korpana

Bhairav Diwase
0कोरपना:- प्रस्तुती म्हटलं की स्त्रीचा पुनर्जन्मच आणि या परिस्थितीत आरोग्य सेवा वेळेवर मिळाल्या नाही तर जीवासी मुकावे लागते. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील नांदा येथील रंजनी सुरेश तलांडे या गर्भवती मातेच्या धाडसी वेदनादायी प्रवास थक्क करणारा आहे सपुर्ण चंद्रपूर जिल्हात काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत होता.
रंजनी सुरेश तलांडे चंद्रपूर जिल्ह्यातील नांदा येथील आहे. दि. १४ जुलै ला धो - धो पाऊस चालू असतानाच सायंकाळ ७ च्या सुमारास वेदना सुरू झाल्या. येथील अशा सेविका लता गेडाम यांना मदतीला घेऊन त्या ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे पोहोचल्या. परंतु येथील डॉक्टरांनी रेफर टू राजुरा आणि राजुरा वरून रेफर टू जिल्हा रुग्णालय चंद्रपूर अशी चिट्टी हातात मिळाली आणि परिवाराला धक्काच बसला. पूर परिस्थितीने जिल्ह्यातील सर्व मार्ग बंद होते.
जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे सर्व परिवाराच्या चिंता वाढल्या असतांना एक मार्ग निघाला चुनाला येथील माणिकड रेल्वे स्टेशन ने बल्लापुर जायचं आणि तिथून चंद्रपूर भर पावसात कुटुंबानी रेल्वे स्टेशन गाठले. वेदनादायी गर्भवती रंजनी तलांडे यांनी धीर न सोडता प्रवास सुरु झाला. माणिकगड स्टेशन गाठले परंतु तिथे थांबा असणारी एकही गाडी उपलब्ध नव्हती शेवट स्टेशन मास्तर यांना विनंती करून सिकंदराबाद दानापूर गाडीतून बल्लारपूर स्टेशन पर्यंत अश्या परिस्थिती असतांना सुद्धा डब्यात शौचालय च्या बाजुला खाली बसुन तिला बल्लारशहा स्टेशन पर्यंत प्रवास करावा लागला.
बल्लारपूर स्टेशन वरून शासकीय रुग्णालया चंद्रपूर गाठायला तब्बल रात्री १.३० वाजले ७ तास प्रवास करून १५ तारखेला सकाळी तिने जुळ्या गोंडस बाळास जन्म दिला. या सर्व प्रसंगात आशा सेविका लता गेडाम यांचा मोलाचा वाटा होता.
१४ वर्षांच्या काळात माझी ही पाहिली वेळ आहे. पूर परिस्थितीमुळे इतक्या संकटाचा सामना करावा लागला
लता गेडाम, आशा सेविका, नांदा.
ग्रामीण रुग्णालय गडचांदूर हे फक्त रेफर टू चंद्रपूर याच कामासाठी आहे.कुठल्याही नॉर्मल केसेस ला रेफर केले जाते.
प्रणित अहिरकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख

ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे तज्ञ डॉक्टर आले असून स्त्री रोग तज्ञ अजून पर्यंत मिळाले नाही व रुग्णांना ज्या सोई सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे तशा सोई सुविधा मिळत नाही.
उपजिल्हा रुग्णालयाची मागणी अनेक वर्षा पासून आम्ही करत आहो मात्र आमदार साहेबांनी राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालय करून तिथे सुद्धा हीच परस्थिती आहे हे या वरून लक्षात येते.
सतिश दशरथ बिडकर
प्रहार जनशक्ती पक्ष गडचांदुर

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)