Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

पत्नीला पळविल्याचा राग, प्रियकराच्या वडिलांनाच संपविले #murder


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील नागलोन गावाजवळील कोराडी नाल्यात आढळून आलेल्या अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटली असून तो इसम माजरी येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वणी ते वरोरा जाणा - या महामार्गावर मौजा नागलोन शेतशिवारातील कोराडी नाला पुलाच्याखाली नाल्याच्या थडीवर एका पुरुषाचे प्रेत पडलेले आहे अशी माहिती माजरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता एक अंदाजे 50 वर्ष वयाचा पुरुष उबडया स्थितीत कोराडी नाल्याचे पुलाखाली मरुन पडलेला असल्याचे आढळून आले. त्यानुसार घटनास्थळाची व प्रेताची पंचासमक्ष पाहणी केली असता नमुद मृतक अनोळखी पुरुष , वय 50 वर्ष , ज्याचे डोक्याचे उजवे बाजुला जबर मारहाण केल्याच्या जखमा आढळून आल्या . त्यानुसार नमुद अनोळखी मृतकाचा खुन झाला असल्याबाबत दाट संशय आला होता . त्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा करुन पोस्टे माजरी येथील पोहवा हरिदास चोपने यांनी शासनातर्फे दिलेल्या तक्रारीवरुन पो.स्टे . माजरी येथे प्रथम अप क्र 69 / 2022 कलम 302 भादवी प्रमाणे नोंद करण्यात आला . सदर गुन्ह्याचे अनुषंगाने मा . श्री अरविंद साळवे ( भा.पो.से. ) पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी तसेच पोलीस स्टेशन माजरी येथे भेट देउन गुन्ह्याचे तपासाबाबत निर्देश दिले या वरून उपविभागीय • पोलीस अधिकारी श्री आयुष नोपानी , भा.पो.से. यांचे नेतृत्वात तपासाकरीता पोलीस स्टेशन माजरी , स्थानिक गुन्हे शाखा , उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वरोरा , सायबर सेल चंद्रपुर येथील पोलीस स्टॉफ ची वेगवेगळी तपास पथक गठीत करण्यात आली.
 दरम्यान, अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असतानाच सिकंदर रामभाउ पाटील रा . माजरी कॉलरी याने पोलिसांनी प्रसिध्द केलेल्या शोध पत्रिकेनुसार मृतकाचे प्रेत पाहुन ओळखले व सदर गुन्ह्यातील मृतक त्याचे वडील रामभाऊ ज्ञानेश्वर पाटील वय 50 वर्ष , रा . आंबेडकर वार्ड माजरी कॉलरी हेच असल्याचे स्पष्ट सांगीतले. त्यावरुन नमुद मृतकाची ओळख पटली आहे . त्यानंतर सदर गुन्ह्याचे पुढील तपासादरम्यान मृतकाचा मुलगा सिंकदर रामभाउ पाटील रा . माजरी कॉलरी यास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, माजरी कॉलरी येथील पिंटु पेटकर याचे पत्नीसोबत माझे प्रेमसंबंध असल्याचा संशयातुन पिंटु पेटकर हा नेहमी आमचे सोबत वादविवाद करत होता, मला व माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी देत होता असे सांगीतले . त्यावरून लागलीच आशिष उर्फ पिंटु प्रदीप पेटकर , वय 32 वर्ष , रा . आंबेडकर वार्ड माजरी कॉलरी यास ताब्यात घेतले . त्यास सदर गुन्ह्यासबंधाने बारकाईने विचारपुस केली असता त्याने मृतकाचा मोठा मुलगा सिकंदर रामभाउ पाटील यांने माझ्या पत्नीसोबत प्रेमसबंध प्रस्तापीत करुन पळवून नेले व तो भद्रावती येथे माझ्या पत्नीसह राहत आहे . त्यामुळे तो मला मिळत नव्हता . त्यामुळे त्याचा राग मनात धरुन मी सिंकदरच्या वडीलाला दोन गाडीमध्ये मध्ये साथीदारांचे सोबत मिळुन महाविर स्कुलमध्ये पुर पिडीत लोकांच्या कॅम्प मधुन चारचाकी जबरदस्तीने बसवुन कोराडी नाल्याचे पुलीयाजवळ नेउन कोणत्या तरी हत्याराने डोक्यावर मारले व पुलाच्या खाली टाकुन दिले . मृतकाचा मोठा मुलगा सिकंदर रामभाउ पाटील याने आरोपी आशिष उर्फ पिंटु प्रदीप पेटकर , वय 32 वर्ष , रा . आंबेडकर वार्ड माजरी कॉलरी याच्या बायकोला पळवुन नेले . मुलाचा बदला घेण्याकरीता त्यांनी कट रचुन वडीलास जिवानिशी ठार मारले व वडीलाचे मयतीला जेव्हा आरोपीचे पत्नीला पळवुन नेणारा सिकंदर रामभाउ पाटील हा घरी येईल , त्यावेळी त्याला सुध्दा ठार मारणार असल्याचे त्याने सांगीतले .
 मा . पोलीस अधिक्षक सा . चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात तपास अधिकारी श्री आयुष नोपानी , सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सा . वरोरा , श्री बाळासाहेब खाडे , स्थानिक , पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा चंद्रपुर , पो.नि. पाटील , वाहतुक शाखा चंद्रपुर , सपोनि विनीत घागे , ठाणेदार पो.स्टे माजरी , सपोनी अजितसिंग देवरे , पोस्ट माजरी , सपोनी बोबडे , स्था . गु . शा . चंद्रपुर , सपोनि भोयर , सपोनी कापडे व स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुरचे स्टाफ , सपोनी मडावी पो.स्टे वरोरा , पोउपनि कोल्हे पोस्टे भद्रावती , सायबर सेल चंद्रपुरचे पोलीस अंमलदार , पोलीस स्टेशन माजरी येथील पोहवा हरीदास चोपने , पोहवा गजानन जुमडे , पोहवा बंडु मोहुर्ले , पोहवा सुधाकर घाटे , नापोअं अतुल गुरनुले , नापोअं अनिल बैठा , पोअं गुरु शिंदे , पोअं आकाश चेन्नुरवार , पोअं हरीचंद्र , पोअं रविंद्र गिते , मपोअ अक्षिता , पोस्टे बल्लारशा पोअं शरद कुळे , पोअं , संतोष दंडेवार , उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे मनोहर आमने , मधुकर आत्राम यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला असुन मा . आयुष नोपानी ( भा.पो.से. ) सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा हे पुढील तपास करीत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत