जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्राने शेतकऱ्यावर वार #attack

Bhairav Diwase

गोंडपिपरी:- जुन्या वैमनस्यातून गेल्या अनेक दिवसापासून सूरू असलेल्या वादाने आज गंभीर रूप घेतले. शेतातील कामात गुंतल्याचे बघून काटा काढण्याच्या हेतून सुरीन वार करून एकाला गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील शेतशिवारात आज सकाळी घडली.
प्रफूल मेश्राम व आनंद मेश्राम विठ्ठलवाडा येथील रहिवाशी आहेत. दोघांचेही गेल्या अनेक दिवसांपासून वाद होते.यासंदर्भात गोंडपिपरी पोलीस स्टेशन मध्ये अनेकदा एकमेकांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या.
दरम्यान रविवारी आनंद मेश्राम हा सकाळी आपल्या शेतात गेला. शेतात खिंड पाडण्याचे काम तो करित होता. याचवेळी प्रफूल मेश्राम हा मोठी सूरी घेऊन तिथे पोहचला.आनंदला काही कळण्याच्या आत प्रफुलने आनंदच्या मानीवर, हातावर व इतर ठिकाणी गंभीर वार केले. व पसार झाला. सुरीच्या वाराने आनंदला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. यावेळी तो बेशुध्द झाला.
आजूबाजूच्या लोकांना घटनेची माहिती कळताच त्यांनी बैलबंडीवर आनंदला गावात आणले यानंतर त्याला गोंडपिपरीतील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान त्याची गंभीर अवस्था लक्षात घेता त्याला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गोंडपिपरी पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सूरू केला आहे. दरम्यान आरोपी फरार झाला आहे.