💻

💻

शहरातील तीन आरोपीकडून बेकायदेशीर शस्त्र जप्त #chandrapur #Rajura

राजुरा:- राजुरा शहरातील सोमनाथपुर वार्डात काही लोकाकडे बिहार येथून घातक शस्त्र आणण्यात आल्याची राजुरा पोलिसांना माहिती मिळाली त्यावरून सोमनाथपुर वार्डातील तीन आरोपींना संशयास्पद म्हणनू ताब्यात घेऊन चौकशी केली त्यांच्या कबुली जबाबानुसार या तिन्ही आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल, एक देशी कट्टा, एक स्टील तलवार एक चक्र असलेले घातक शस्त्र हा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आर्म एक्त नुसार गुन्हा नोंद झाला असून तिन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार,पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक एस व्ही दरेकर,पोलीस उपनिरीक्षक हिराचंद गव्हारे,पोलीस नायक नागोराव भेंडेकर,संदीप बुरडकर,शिपाई रामा बिंगेवाड,यांनी केली पुढील तपास सुरू आहे
राजुरा शहरात अश्यारीतीने पोलिसांचे समय सूचकतेने पुढील अनर्थ टळला आणि जनतेनी पोलिसांचे अभिनंदन ही केले आहे परंतु हा प्रकार राजुरा शहरात आढळून आल्याने जनतेत सुद्धा संताप व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत