Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भद्रावतीत आढळला पट्टेरी मण्यार साप #snake #snakenews


भद्रावती:- संपूर्ण महाराष्ट्रात फक्त गडचिरोली जिल्ह्यातच आढळणारा पट्टेरी मण्यार साप भद्रावतीत आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सदर साप येथील पाॅवर ग्रीड मधील बगिच्याजवळ नुकताच आढळून आला. येथे साप असल्याची माहिती येथील रोजंदारी कामगार राहुल बावणे याने त्वरित सर्पमित्र श्रीपाद बाकरे यांना दिली. बाकरे यांनी आपल्या सर्पमित्र सहका-यांना साप पकडण्यास सांगितले. त्यानुसार सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
‌दरम्यान, सर्पमित्र श्रीपाद बाकरे यांनी सदर साप केवळ गडचिरोली जिल्ह्यातच आढळून येत असून भद्रावतीत कसा आढळला असा प्रश्न उपस्थित करुन कदाचित ट्रान्स्फार्मरच्या वाहतुकीत आला असावा अशी शंका व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत