वैनगंगा नदीत उडी घेऊन दोघांची आत्महत्या #suicide #chandrapur

Bhairav Diwase

ब्रम्हपुरी:- एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. यातील लता भाऊराव डोईजड रा. नागभीड हिने ब्रम्हपुरी-आरमोरी पुलावरून पाण्यात उडी घेतली. तर ब्रम्हपुरी-वडसा पुलावरून विक्की मारोती चिकणकर रा. सोनेगाव याने सायंकाळी पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यातील विक्की चिकनकर हा तरुण तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी असून अवघ्या तीन महिन्याआधी त्याचे लग्न झाले होते. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता ब्रम्हपुरी-वडसा वैनगंगा नदी पुलावर दुचाकी पुलाच्या कडेला ठेऊन त्याने नदीत उडी मारली. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
तर लता डोईजड रा. नगभीड येथील रहिवासी असून ब्रम्हपुरी-आरमारी वैनगंगा नदीच्या पुलावरून सोमवारी दुपारी १ ते २ वाजता दरम्यान उडी मारली. सदर महिला मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. ती सकाळी घरी कुणालाही न सांगता निघून गेली होती. घरच्यांनी शोधाशोध केली असता आरमोरी-ब्रम्हपुरी पुलावर चपला व चिठ्ठी मिळून आल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.