तलाठी अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात #chandrapur #rajura #arrested

Bhairav Diwase
0
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथील तलाठी विनोद गेडाम यांना लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हि कारवाई आज दिनांक 19 जुलैला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास राजुरा येथील शिवाजी नगर येथील निवासस्थानी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी ही कारवाई केली. आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार तालुक्यातील वरूर रोड येथील रेती पुरवठा व्यावसायिक असून त्यांचा रेतीचा ट्रक दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी तलाठी विनोद गेडाम यांनी पकडला होता. त्यावेळी विनोद गेडाम यांनी 70 हजार रुपयांची मागणी तक्रारदारास केली होती. मात्र त्यावेळी गेडाम यांनी 35 हजार रुपये घेऊन ट्रक सोडून दिला होता. यानंतर उरलेले 35 हजार रुपये देण्याचे ठरले होते. यानंतर पुन्हा बाकी राहिलेल्या 35 हजार रुपयांची मागणी तलाठी गेडाम यांनी केली यावर तडजोड होऊन 25 हजार रुपये देण्याचे ठरले. यासंदर्भात वरूर येथील 45 वर्षीय तक्रारदाराने चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाने तक्रारीची पडताळणी केली आणि या प्रकरणी 25 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी राजुरा येथील शिवाजी वॉर्डातील रहिवाशी तलाठी विनोद गेडाम यांच्या घरी पकडण्यात आले. आरोपी तलाठी विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायदा 1988 कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार आरोपीने ही रक्कम स्वीकारली नाही.
ही कारवाई नागपुर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे, पोलिस कर्मचारी नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, संदेश वाघमारे, मेघा मोहुर्ले, सतिश सिडाम यांच्या पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)