गोंडपिपरीत सामुहिक राष्ट्रगीत गायन व कोविड-19 बुस्टर डोस लसीकरण शिबीर संपन्न #gondpipari


गोंडपिपरी:- श्री समर्थ शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायंन्स गोंडपिपरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज दिनांक 17/08/2022 ला भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आझादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत स्वराज महोत्सव चे आयोजन करून समूह राष्ट्रगीत गायन महाविद्यालय मध्ये पार पडले. तसेच महाविद्यालया मध्ये कोविड -19 बुस्टर डोस लस्सीकरण शिबीर घेण्यात आला व यामध्ये 41 विध्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयांचे प्रभारी प्राचार्य डॉ. आशिष चव्हाण,रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र डी. अक्कलवार, प्रा. अविनाश चकिनारपूवार, प्रा. उमेश वरघणे प्रा. पूनम चंदेल,डॉ. तिवारी सर, प्रा. शरद लखेकर, प्राध्यापिका कु नलिनी जोशी,प्रा. संजय कुमार, प्रा. संजय सिंग, प्रा. जगदीश गभने आणि इतर शिक्षक, विध्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत