८५८४९८०८२७ या क्रमांककावरून संदेश आल्यास प्रतिसाद न देण्याचे आवाहन
गडचिरोली:- व्हाट्सअप चा वापर सर्वच लोक करतात. परंतु या अॅपचा वापर करून सध्या मोठ्या प्रमाणात युजर्सची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. इंटरनेटच्या या युगात कोण कुठे आणि कधी व्हायरल होईल याचा नेमच नाही. सोशल मीडियावर एक चुकीचा मेसेज व्हायरल झाला आहे.गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावाचा व फोटोचा गैरवापर करून अनेकांना अनोळखी भ्रमणध्वनी क्रमांकावरून चुकीचे व्हाट्सएप संदेश पाठवला जात असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
८५८४९८०८२७ या अनोळखी भ्रमणध्वनी क्रमांकावरून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या नावाचा व फोटोचा गैरवापर करून अनेकांना चुकीचे व्हॉट्सॲप संदेश पाठविल्या जात असल्याची बाब समोर आली आहे.
ऑनलाईन’ फसवणुकीच्या प्रकारात सर्वत्र वाढ झालेली असताना अज्ञात भामट्यांनी थेट गडचिराेली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनाच लक्ष्य केल्याने विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सदर बाब लक्षात येताच खबरदारी घेत कुलगुरु यांच्या आदेशानुसार स्विय सहायक देवेन्द्र म. मेश्राम यांनी सदर संदेशामुळे अनेकांची फसवणुक होण्याची शक्यता असून सदर भ्रमणध्वनी क्रमांक कुलगुरु व विद्यापीठाशी संबंधीत नाही, भ्रमणध्वनी क्रमांक ८५८४९८०८२७ या अनोळखी नंबर वरुन जर कोणाला संदेश आले असल्यास सदर संदेशास कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात येवू नये असे आवाहन केले आहे.
साभार