सरदार पटेल महाविद्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असून स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीपासून ह्या वर्षीच्या १५ ऑगस्ट पर्यंत अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.


अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान स्वराज महोत्सव साजरा करण्याचे घोषित केले होते. 

स्वराज महोत्सवाचा भाग म्हणुन महाराष्ट्र शासनाने १७ ऑगस्ट रोजी राज्यात समुह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम राबविण्याचे घोषित केले असून त्या अनुषंगाने सरदार पटेल महाविद्यालयात समुह राष्ट्रगीत गायन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, NCC Cadet तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.