Top News

राज्य पत्रकार संघाचे 'पहेलवान' मान. संजयजी भोकरे वाढदिवस विशेष

राज्य पत्रकार संघाचे 'पहेलवान' मान. संजयजी भोकरे वाढदिवस विशेष


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
मुंबई:- वारसा पदाचा नव्हे तर विचार व तत्वांचा असावा यावर ठासून बोलणारे व ठाम असलेले राज्य पत्रकार संघाचे संस्थापक, शिलेदार मा.संजयजी भोकरे साहेब यांना वाढदिवसानिमित्य कोटी कोटी शुभेच्छा......!  काही व्यक्तींमत्वाबद्दल विशेष सांगायचे वा लिहायचे म्हणजे निव्वळ औपचारिकता ठरेल मात्र महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर गोवा, कर्नाटक, गुजरात ते दिल्ली पर्यंत राज्य पत्रकार संघाचा विस्तार करण्याचा दम राज्य कार्यकारिणीला मिळाला व आज सर्वात मोठा पत्रकार संघ म्हणून जी संघाची ओळख आहे त्यामागे खरी प्रेरणा कुणाची असेल तर ती मा. संजयजी भोकरे यांचीच. भोकरे साहेबांमध्ये मी मार्मिक, सडेतोड वक्तृत्व व् नेतृत्व बघितले आहे. साहेबांची पत्रकार सुष्टीच्या प्रत्येक घटकांबाबत असलेली आंतरीक तळमळ संघटनेच्या दर्जेदार विस्तारातुन् सहज लक्षात येते. संघटनेतील प्रत्येक घटकाने ही तळमळ अंगीकारावी हिच खर्‍या अर्थाने मान. भोकरे साहेबांना वाढदिवसाची मनस्वी शुभेच्छा ठरेल.

   मान. संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनात पत्रकार संघ सांभाळण्याची सक्षमता व सहजता लाभलेल्या पहिल्या फळीतील दोन मुत्सद्धांना मी अनुभवले आहे. मान. वसंत मुंडे व मान. विश्वासराव आरोटे. कर्तृत्व व नेतृत्व याचा सहज ताळमेळ व यातून अलंकारीत झालेले या दोघांचे सर्वमान्य नेतृत्व मा. भोकरे साहेबांच्या तालमीत फुलले व आदर्शवत ठरले  आहे. संघटन कौशल्याची खरी गुरुकिल्ली म्हणजे मा.भोकरे साहेब.

पत्रकार संघाचे खऱ्या अर्थाने नेतृत्व करणार्‍यांना सतत काटेरी मुकुट शिरावर घेऊन मागेपुढे करावे लागते. प्रचंड उर्जा खर्च करावी लागते कारण पत्रकारांचे, पत्रकारितेती घटकांचे प्रश्न सोडविताना पुढे पुन्हा अनेक प्रश्न उभे ठाकतात व प्रश्‍नांची उकल करून शासन दरबारी उत्तर सुद्धा आपणच सादर करावी लागतात. या विचित्र चक्रव्यूहातून स्वतःसोबत संपूर्ण संघाला सावरून सन्मानित करण्याचे चातुर्य् व मोठेपणा ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटनेत समोर आणून व नेतृत्वाची संधी देऊन मा.भोकरे साहेबांनी दाखविला आहे.       
राज्य पत्रकार संघात "Quantity व Quality" यांची सांगड घालण्यात प्रदेशाध्यक्ष मान. वसंत मुंडे यांचा मोठा वाटा आहे. पत्रकार सुष्टीच्या समस्या शासनस्तरावर सतत भांडून सोडवाव्या लागतात. एकीकडे शासन दरबारी भांडताना दुसरीकडे सामाजिक सहकार्य संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रमातून पदरी पाडून घेण्याचे महत्त्वकार्य राज्य सरचिटणीस मान. आरोटे साहेब यांनी केले असले तरी यामागची खरी प्रेरणा व मार्गदर्शक कुणाचे तर निर्विवादपणे मा.भोकरे साहेबांचे. आज यांच्या नेतुवात राज्य पत्रकार संघ 365 दिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.

मान.भोकरे साहेबांची अभ्यासू वृत्ती, शिस्तप्रियता, कल्पकता, जिद्द मेहनत, क्षमता किंबहुना एकत्रित व्यक्तिमत्व व संघातील हजारो पदाधिकारी व सदस्यांना लाभणारे त्यांचे मार्गदर्शन  हे आमचे सौभाग्य. त्यांच्या कथनी व करणीतून वृत्तपत्र सृष्टीतील प्रत्येक घटकाला ऊर्जा मिळत आहे.

'खरेखुरे व सरस नेतृत्व' ठरलेल्या मान. भोकरे साहेबांना दीर्घकाळ वृत्तपत्र सृष्टीच्या सुरेल आयुष्याकरीता दीर्घ काळ आरोग्य व आनंदायी आयुष्य लाभो हीच शुभेच्छा....!!!

                लेखन:- प्रा. महेश पानसे, 
                         पूर्व विदर्भ अध्यक्ष,
                          राज्य पत्रकार संघ

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने