Click Here...👇👇👇

विरूर स्टेशन बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रोडचे काम केव्हा सुरू होणार? नागरिकांचा सवाल

Bhairav Diwase

ठेकेदाराचे मात्र दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संताप
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे प्रधानमंत्री सडक योजना अंतर्गत बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत सिमेंट रोड बनवण्यासाठी साठी प्रधान मंत्री सडक योजना अंतर्गत निधी आली होती आणि एक वर्षा पूर्वी कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे परंतु कामाला का सुरुवात होत नाही हा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.
ग्राम पंचायत कार्यालयात ठेकेदार बोलल्या नंतर ठेकेदार फक्त आश्वासन देऊन निघुन जातो की कल से हम चालू करेंगे कल से हम चालू करेगे. पण त्यांचा कल कधी येतचं नाही. आणि रोड ची अवस्था पहिली की खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे काही कळत नाही. फोन वरती ठेकेदारला विचारले की करतोय न काम मनतो. पण जे निधी मंजूर होऊन आली आहे ते परत गेल्या वरती बनवतो का काय? हा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. गावकरी नागरिकांनी वरिष्ठ अधिकारी याना विनंती करते की गाव चे रोड चे काम जुना ठेकेदार करत नसेल तर दुस्याना देऊन लवकरात लवकर चालू करण्यात यावे अशी मागणी केली आहे