तुकूम येथे मोफत आरोग्य शिबीर संप्पन्न #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- आपण समाजाचे काही देणे लागतो या सार्थक भावनेने रुग्णानां सेवा देण्यात याव्यात करिता काजल संजय नेटलवार यांच्या द्वारे आयोजित श्री. विश्वसंज्योत क्लिनिक, संजीवनी मेडिकल तुकूम चंद्रपूर यांच्यासहकार्याने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रुग्णांचे शिबिरात शुगर, बीपी कोलेस्ट्राल, थायराइड चेक करण्यात आले. आणि रुग्णांना औषध गोळ्या वाटप करण्यात आल्या. या शिबिराला विशेष सहकार्य डॉ. जाहणारा शेख, संजीवनी किशोर कंभारे, पंकिड लॅब, हर्बल कंपनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.