आसोला मेंढाच्या नहरात पाच बालके बुडाली #chandrapur #saoli


चौघांना बाहेर काढण्यात यश, एक वाहून गेली
सावली:- सावली शहरातून गेलेल्या आसोला मेंढा नहरात चार बालके आंघोळ करत असताना खोल पाण्यात ती बु़डू लागली. या बालकांना वाचविण्यासाठी एका मुलीने उडी घेतली. चार बालकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र वाचविण्यासाठी गेलेली मुलगी अद्याप सापडलेली नाही. तिचा शोध घेणे सुरू आहे.
जिल्ह्यातील सावली शहराला लागून आसोला मेंढा तलावाचे नहर गेले आहे. या नहरात कपडे धुवायला गेलेल्या आई सोबत बालके गेली होती. आई कपडे धुत असताना ही बालके नहरात आंघोळ करायला उतरली. मात्र खोल पाण्यात गेल्याने रोहीत अनिल मेडपल्लीवार ( वर्ग 7 ),अमित अनिल मेडपल्लीवार ( वर्ग 5 ),राहूल अंकुश मक्केवार ( वर्ग 4 ),सुश्मिता अंकुश मक्केवार ( वर्ग 8 ) ही मुले बुडू लागली. तिथेच उभ्या असलेल्या काजल अंकूश मक्केवार हिने तिच्या भावा बहीणीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच आरडाओरड झाली. आजूबाजूला असलेले नागरिक धावत आले. बुडणाऱ्या चार मुलांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र काजल मक्केवार ही वाहून गेली. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. पोलीस काजलचा शोध घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत