राज्यस्तरिय त्वायक्वांडो स्पर्धेत यश धोंगडेला सुवर्ण पदक #chandrapur #bhadrawati


भद्रावती:- येथील चांदा आयुध निर्माणीतील केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी यश प्रशांत धोंगडे याने नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या राज्यस्तरिय त्वायक्वांडो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून भद्रावती शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
गोवा येथे पार पडलेल्या राज्यस्तरिय त्वायक्वांडो स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अनेक शाळांतील खेळाडूंनी सहभाग दर्शविला होता. त्यात यश धोंगडे या खेळाडूने १७ वर्षांखालील वयोगटातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल त्याचा सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यापूर्वीही त्याने अनेक पदके पटकावली आहेत. तो सावरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील फार्मासिस्ट प्रशांत धोंगडे आणि येथील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापिका वंदना धोंगडे यांचा मुलगा आहे. तो आयुध निर्माणीच्या केंद्रीय विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत आहे.
या स्पर्धेत याच विद्यालयाचे १४ वर्षांखालील वयोगटातून सौरभ शिल आणि मंदार हे दोन खेळाडू रौप्य पदकाचे मानकरी ठरले आहेत. या सर्व खेळाडूंचे विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद आणि खेळाडूंचे आई-वडील यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत