Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

मनसेच्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीने दिले समर्थन #chandrapur #Jivati


भेंडवी ते परमडोली रस्ता नित्कृष्ट दर्जाचा 
जिवती:- चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणार्‍या जिवती तालुक्यातील मुख्य मार्ग म्हणजे भेंडवी ते परमडोली या रस्ताचे काम गेल्या दोन-तीन वर्षापासून कासव गतीने चालू असून, रस्त्याचे काम जलद गतीने करण्यात यावे व हा रस्ता उत्कृष्ठ दर्जाचा बनवा यासाठी आम आदमी पार्टी व प्रहार जनशक्ती पक्षाने रस्तारोको सुद्धा केला होता. याचीच दखल घेत रस्त्याच्या कामाला गती सुद्धा मिळाली परंतु या गतीमध्ये रस्ता निकृष्ट दर्जाचा करण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे रस्त्याचे काम अर्धवटच झाले असून फक्त एक ते दोन महिन्यातच रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडल्याने सदर रस्ता हा निकृष्ट दर्जाचा बनत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिवती तालुका अध्यक्षा शिवगंगां सूर्यकांत मठपती यांनी चिखली येथे अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केली असून रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करून कंत्राटदारावर फौंजदारी गुन्हा दाखल होईपर्यन्त अन्नत्याग आंदोलन झेडणार असल्याचे शिवगंगा मठपती व बालाजी पाटील यांनी म्हटले आहे.
रस्ताच्या बाबतीत वारंवार विशेष लक्ष घालणाऱ्या आम आदमी पार्टी ने सुद्धा आता आपली इंट्री करत आपने अन्नत्याग आंदोलनाला समर्थन दिले आहे,
यावेळी आपचे कार्यकर्ते सुनील राठोड, गोविंद गोरे, गोपाल मोहिते, अरविंद चव्हाण, नितेंश करे यांनी सुद्धा मनसे च्या त्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन जोवर उच्चस्तरीय चौकशी होणार नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी सुद्धा मनसे सोबत असल्याचे आश्वासन दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत