पोंभूर्णा:- तालुक्यातील टोक येथील पुरग्रस्त कुटुंबांना जिल्हा काॅंग्रेस कमेटी ग्रामीण यांचे तर्फे अन्नधान्याची किट देऊन सहकार्य करण्यात आले.
तालुक्यात वैनगंगा नदिवर वसलेल्या गावांना पुराचा तीनदा फटका बसल्याने नदीतीरावर वसलेल्या गावांना पुरपरस्थितीचा सामना करावा लागला. यात जुनगाव, गंगापूर व टोक या गावातील जनजीवन विस्कळित झाले होते. यातच टोक हे गाव वैनगंगेच्या पुराने वेढल्यामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी टांक येथील २६ कुटुंबाला तालुका प्रशासनाने त्यांची चिमणाहेटी जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करून राहण्याची व्यवस्था केली. याची माहिती मिळताच पुरग्रस्तांना मदत म्हणून माजी कॅबीनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाठविलेल्या अन्नधान्याची किट जिल्हा कांग्रेस कमेटी ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी टाेक येथील २६ कुटुंबीयांना दिली.
यावेळी तालुका अध्यक्ष कवडू कुंदावार, देवाडा खुर्द सरपंच विलास मोगरकार, नवेगाव मोरे सरपंच जगदिश शेमले, चेक ठाणेवासना सरपंचा सुरेखा मेश्राम यांची उपस्थीती हाेती.