लग्नाचे आमिष दाखवून 'तो' करत होता वारंवार अत्याचार #chandrapur #mul #torture

Bhairav Diwase

अखेर त्या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


मुल:- मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. काल रात्री मुल येथील उपाध्ये लाज मधून त्या नराधम आरोपीला मुल पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी ३७ वर्षीय आकाश अरुण सातकर राहणार समता नगर, पॉलिटेक्निक कालेजजवळ वर्धा येथील असून पीडित महिला ब्रह्मपुरी ची रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. दोघांमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये ओळखी झाली आणि आरोपी हा पीडितेला मी तुझ्या सोबत प्रेम करतो असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने अनेकदा वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता.
आरोपी हा जीव मारण्याची धमकी देत असल्यामुळे भीतीपोटी पीडिता तक्रार करण्यास टाळत होती, अखेर काल रात्री ही आरोपी हा पीडितेला घेऊन बस स्थानक मुल जवळील असलेल्या न्यू उपाध्ये लाज येथे घेऊन जाऊन पिडीतेवर अत्याचार केला, पीडित महिलेने लग्नाबद्दल विचारणा केली असता आरोपी आकाश सातकर याने टाळाटाळ करीत असल्याने पीडित महिलेने मुल पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरूद्ध तक्रार दिली.
सदर आरोपी ला उपाध्ये लाज येथून ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे आणि पोलीस निरीक्षक सतीश सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राजश्री रामटेके पुढील तपास करीत आहे.