पोंभुर्णा:- 'हर घर तिरंगा' मोहिमेल मजबूती देण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहे. भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव प्रत्येक गावात, शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यासाठी 'आझादी का अमृत महोत्सव' कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत 'हर घर तिरंगा' अभियान सुरू आहे. 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्टपर्यंत सलग तीन दिवस राष्ट्रध्वज फडकवला जाईल.
जनजागृती करण्याकरिता आज दिनांक 10 ऑगस्ट 2022 ला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. पोंभुर्ण . चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्ण. चिंतामणी सायन्स कॉलेज पोंभुर्ण . चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्ण. चिंतामणी जुनियर कॉलेज पोंभुर्ण . यांच्या संयुक्त विद्यमानाने 75 स्वतंत्र अमृत महोत्सव हर घर तिरंगा. या कार्यक्रम अंतर्गत सर्वप्रथम राष्ट्र गीत घेण्यात आले. त्यानंतर रॅली काढण्यात आली.
रॅलीला प्रमुख उपस्थिती पोंभुर्ण तहसीलदार शुभांगी कनवडे मॅडम, पोंभुर्ण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी, पोंभुर्ण नगरपंचायत मुख्याधिकारी तिरानकर सर तसेच महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य. डॉ. सुधीर हुगे. एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी .डॉ संघपाल नारनवरे. डॉ पाठक. अमोल गारगिलवार. विरुटकर सर . डॉ. परमानंद बावनकुळे. डॉ. शैलेंद्र गिरीपुंजे प्रा. संतोष कुमार शर्मा यांनी रॅलीचे आयोजन केले.