Top News

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान #chandrapur #rain


चंद्रपूर:- राज्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातलं आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणावरील पोडसा पुल पाण्याखाली गेल्यामुळे महाराष्ट्र-तेलंगणाचा संपर्क तूटला आहे.
चंद्रपूर-गडचीरोली जिल्हाला जोडणारा आष्टी पुलही पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पुलावर पाणी साचल्याने मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. यामध्ये भोयगाव - धानोरा, वरोरा - वणी मार्ग ठप्प झाले आहेत. राजुरा - बल्लारपूर, सास्ती - बल्लारपूर, घुग्घुस - मुंगोली मार्ग बंद पडले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने १० ऑगस्टपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर आज चंद्रपूरसाठी रेड अलर्ट आहे.
मागील दोन दिवसापासून वैनगंगा, वर्धा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व चंद्रपूर जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द प्रकल्प, वर्धा नदीवरील अप्पर वर्धा प्रकल्प व निम्न वर्धा प्रकल्प, इरई नदीवरील इरई धरण, पैनगंगा नदीवरील ईसापुर धरण व वर्धा नदीच्या उपनद्यावरील धरणांमधून अधिकचे विसर्ग प्रवाहित करण्यात येत आहे.
अतिवृष्टीमुळे पाण्याचा वेढा वाढल्यास धरणातून विसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, जिल्ह्यात वाहणाऱ्या वैनगंगा, वर्धा, पैनगंगा व इरई या नद्यांकाठी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने