Top News

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा #chandrapur



चंद्रपूर:- दि.०९/०८/२०२२ रोज मंगळवार ला सकाळी ठीक ०९:३० वाजता. गोटूल भूमी मुरखळा येथे आदिवासी गोंडवाना गोटूल समिती, मुरखळा / नवेगाव तसेच संलग्न जंगोम सेनाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई नागेशजी टेकाम यांनी समितीचे पदाधिकारी व मुरखळा, नवेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक व समस्त आदिवासी बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्तरंगी ध्वजारोहण सोहळा पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव श्री. साईनाथ पुंगाटी यांनी केले व त्यात त्यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्व उपस्थित बांधवाना पटवून दिले.
त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री. हरिश्चंद्र कन्नाके साहेब यांनी आपल्या भाषणा मधून प्रत्येक आदिवासी बांधवानी उच्च शिक्षणाची अपेक्षा बाळगून सदैव प्रयत्नशील राहावे व स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा असे बहुमूल्य मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे श्री. नैताम साहेब, श्री. विनोदजी दुग्गा, श्री. रिंगुजी पोटावी साहेब, श्री. नागेशजी टेकाम पोलीस उपनिरीक्षक,श्री. उमेशजी वेलादी, तसेच जंगोम सेना सरसेनापती श्री. अमितजी गेडाम यांनी आदिवासिंची संस्कृती व तिचे संरक्षण त्याचप्रमाणे शिक्षण, रोजगार व आरोग्य इत्यादी बाबीं बाबत सदैव जागृत राहून समाजाचा संवर्धन व उद्धार कसं करता येईल? या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. अर्चनाताई टेकाम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दऱ्या खोऱ्यात असणारा आदिवासी समाज मुख्यप्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वापासून कोसो दूर राहिला आहे. या मूळ निवासी आदिम जमातीचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ०९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस घोषित केला आहे. म्हणून सर्व आदिवासी बांधवानी या दिवशी हा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पाडावे व सदैव विकासाच्या दिशेने जागृत राहावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचलन श्री. आर. जी. तुमराम यांनी केले. तर सर्व उपस्थित बांधवांचे आभार प्रदर्शन श्री. सचिन भलावी यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने