Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

राजस्थान मधील हत्याकांडातील आरोपीला फासावर लटकवा #chandrapur #pombhurna


पोंभुर्णा येथे वंचित बहुजन आघाडी चे आंदोलन

महामहीम राष्ट्रपती यांना निवेदनातुन केली मागणी
पोंभुर्णा:- राजस्थान मधील जाल्लोर जिल्ह्यातील सुराणा गावात एका ९ वर्षाच्या विद्यार्थ्यांला तेथील शिक्षकाने पाण्यासाठी बेदम मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.हि घटना मानुसकिला काळीमा फासणारी आहे त्यामुळे या शिक्षकाला फासावर लटकविण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा महामहीम राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
एक दलीत विद्यार्थी इंद्रपाल मेघवाल हा शाळेतील माठातील पाणी पिल्याने तेथील जातियवादी मानसिकतेत असलेल्या छैलसिंग या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली या मारहाणीत इंद्रपाल मेघवाल याचा मृत्यू झाला. संपुर्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना अशा घटना घडतात यामुळे येथील दलीत स्वातंत्र्य नाहीत का असा प्रश्न हि निवेदनातून विचारला आहे. अमृतमहोत्सव स्वातंत्र्याच्या काळात अशा प्रकारे काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्या छैलसिंग या नराधमास फासावर लटकविण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा यांनी महामहीम राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वंचित बहुजन आघाडी ने यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष भुषण फुसे यांनी केले. या मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथुन निघाला घोषणा नारे देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला तिथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष भुषण फुसे, जिल्हा महासचिव मधुकर उराडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळके वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विलास रामगिरकर,महासचिव रविभाऊ तेलसे,महासचिव मंगल लाकडे, उपाध्यक्ष विजुभाऊ दुर्गे, उपाध्यक्ष शालीक रामटेके,सामाजिक कार्यकर्ते रुपेश निमसरकार, नगरसेवक अतुल वाकडे, नगरसेविका रिनाताई उराडे, शहराध्यक्ष राजु खोब्रागडे, मिलिंद गोवर्धन, युनिल मानकर, लोकेश झाडे, उमाकांत लाकडे,प्रशिक मानकर,अजय उराडे,पराग उराडे, सुमित उराडे, रिमोज दुर्गे, विजय काशिनाथ उराडे, संतोष तेलसे, अनिल वाकडे, गौतम वनकर,जलील गोवर्धन, सुमित मानकर, निश्चल भसारकर देविदास वाळके ,प्रकाश अर्जुनकार,नवलदास गोवर्धन, सुप्रीया उराडे, मंगला मानकर, माधुरी घडसे,प्रतिभा उराडे,गिता उराडे,उषा मानकर, स्मिता उराडे, मेघा राहुल मानकर, इंदिरा उराडे, विश्रांती उराडे,चंद्रकला मानकर,सागरिका उराडे, वंदना गेडाम, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत