गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर # chandrapur
चंद्रपूर :- येथील शासकीय विश्राम गृह येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा चंद्रपूर कार्यकर्ता व पदाधिकारी बैठक आज आयोजित करण्यात आली होते.
त्यात जिवती पंचायत समितीचे माजी सभापती भीमराव मेश्राम यांची जिल्हाउपाध्यक्ष पदी, येसापूरचे माजी सरपंच हनुमंत कुमरे यांची जिवती तालुकाध्यक्ष पदी आणि गोंडपिपरी तालुकाध्यक्ष पदी तर पोंभुर्णा तालुकाध्यक्ष पदी जगनजी वेलके यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय महासचिव गोंडराजे वीरेंद्रशहा आत्राम, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरीश उईके, प्रदेश कार्यवाहक मनोज आत्राम, प्रदेश उपाध्यक्ष सुखलाल मडावी, प्रदेश कार्याध्यक्ष बळवंतरावजी मडावी, प्रदेश महासचिव सुधाकर आत्राम, प्रदेश कोषाध्यक्ष महेशजी बमनोटे, प्रदेश संघटक मंत्री भास्कर तुमराम, नामदेव शेडमाके, जिल्हाध्यक्ष बापूजी मडावी, माजी जिल्हाध्यक्ष बापूराव मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते गजानन पाटील जुमनाके, गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला मोर्चा यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजयाताई रोहनकर, माजी नगरसेविका राधाबाई आत्राम, भीमराव पाटील जुमनाके, राजे संजीव आत्राम, अरुण उदे, संजय सोयाम, मेजर बंडुजी कुमरे, गणपत नैताम, सारंग कुमरे आणि जिल्हातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडीबद्दल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, जिवती नगरपंचायतीचे गटनेते ममताजी जाधव, नगरसेविका सतलूबाई जुमनाके, नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, नगरसेवक जमालूद्दीन शेख, नगरसेवक क्रीष्णा सिडाम, माजी जिल्हा परिषद सदस्य निशिकांत सोनकांबळे, चंद्रपूर पंचायत समितीचे माजी सदस्य विनोद सिडाम, माजी सरपंच श्रीहरी सिडाम, विलास परचाके, मारू पाटील नैताम, केशव कोहचाळे, प्रा. लक्ष्मण मंगाम, संकेत कुळमेथे, मतीन शेख, रहीम सय्यद, उमेश आडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

ही निवड गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरीश उईके यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत