Top News

पोंभूर्णा तालुक्यातील सोळा गावांचा पेसात समावेश करा #Chandrapur #pombhurna


मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

तालुक्यातील सरपंच व गोंडवानाचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन
पोंभूर्णा:- आदिवासी बहूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील सोळा गावात आदीवासींचे वास्तव्य पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असतांना सुद्धा यातील गावांना हेतूपरस्पर डावलून त्यांना विकासापासून दुर ठेवल्या जात आहे. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी अनुसूची ५ व ६ नुसार तालुक्यातील सोळाही गावांचा पेसा मध्ये समाविष्ट करण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन आदिवासी बहुल भागातील सरपंच व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने तहसिलदार मार्फत प्रशासनाला इशारा निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

पोंभूर्णा तालुका आदिवासी बहूल क्षेत्र असून आदिवासी समाजाची संख्या मोठी आहे.मात्र आदिवासी समाज आपल्या मुलभूत हक्क अधिकारापासून वचिंत आहेत.अनेक योजनेसाठी त्यांचा फक्त वापर केला जातो.
त्यामुळे अनेक आदिवासी हालाखीचे जिवन जगत आहेत. आदिवासीचे जीवनमान उंचावण्यासाठी अनुसूची ५ व ६ नुसार पेसा अंतर्गत योजनेमुळे आदिवासी समाजाचा विकास होऊ शकतो. यासाठी पोंभूर्णा तालुक्यातील १६ गावांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आदिवासी समाजाची लोकसंख्या असल्याने त्या गावांना पेसा मध्ये समाविष्ट करण्यात यावे या प्रमुख मागणीचे निवेदन तालुक्यातील सरपंच व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने तहसिलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी गोंडवानाचे तालुका अध्यक्ष जगन येलके, सरपंच विलास मोगरकार, सरपंच श्रीहरी सिडाम, सरपंच कांता मडावी, सुरेखा मेश्राम, दर्शना जुमनाके,पुष्पा कुळमेथे,पल्लवी चाहाकाटे,शालीक सिडाम, गीता गणवीर, जगदिश शेमले, सामाजिक कार्यकर्ते गणेश परचाके,हरी जुमनाके, संतोष गेडाम, दर्शन शेडमाके,प्रेमदास इष्टाम, महिपाल सोयाम, देवानंद कुळमेथे व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने