🌄 💻

💻

पोंभूर्णा तहसीलदार शुभांगी कनवाडे उत्कृष्ट तहसिलदार म्हणून सन्मानीत #chandrapur #pombhurna


पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्याच्या तहसीलदार शुभांगी कनवाडे यांनी २०२१-२२ या वर्षात उत्कृष्ट नियोजन करून तालुक्यातील महसूल प्रशासनांर्तगत नेमून दिलेले कामे चांगल्या प्रकारे करून घेतल्याबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातून उत्कृष्ट तहसीलदार म्हणून त्यांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सन्मानीत केले.

१ ऑगस्ट महसूल दिना निमित्त दरवर्षी प्रत्येक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येतो २०२१-२२ या वर्षात महसूल प्रशासनांतर्गत उत्कृष्ट नियोजन करून तालुक्यात तहसिलदार पदाला नेमून दिलेल्या विविध क्षेत्रातील कामे उत्कृष्टरित्या पूर्ण करून घेतले. त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल त्यांना जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसिलदार म्हणून १ ऑगस्टला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत