राजुरा:- राजुरा शहर हे लोकसंख्येने झपाट्याने वाढत आहे , त्यातच वडिल आणि मुले ऐकाच घरात विभक्त कुटुंब म्हणून राहतात, ऐका विज मिटर वरती अधिकचे युनिट भार पडतात म्हणून वडिलांच्या मालमते वरती वडिलांच्या सहमतीने मुलाने अथवा त्याच्या वारसदाराने महावितरण कार्यालयाला विज मिटर मिळण्यासाठी अर्ज केले असता अधिकारी यांच्या कडुन विज मिटर देणे नाकारल्या जात आहे, त्यामुळे अनेक गरजु ग्राहकांना जास्तीच्या बिलाचा भुर्दंड बसुन विज पुरवठ्या पासुन वंचित ठेवल्या जात आहे, ऐका घर टॅक्स वरती ऐकच मिटर दिल्या जाईल असे सांगण्यात येत आहे,
पुर्वी ऐका घराला दोन - तिन मिटर दिल्या जात होते, राजुरा शहर विभाग सोडुन इतर कार्यालयात समंतिपत्रावर वारसांच्या नावे मिटर देत आहे, महावितरण कंपनी कडून किंवा प्रशासनाकडून असे कोणतेही परीपत्रक नसताना अधिकारी यांच्या मनमानिमुळे राजुरा शहरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे वरीष्ठानि या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करुन पुर्वी प्रमाणे समंतिपत्रावर विज मिटर देण्यात यावे अशी मागणी राजुरा शहरातील नागरीका कडुन होत आहे.
त्यातच विज मीटरचा तुटवटा सुधा कंपनीकडून होत आहे, त्यामुळे ग्राहकांना जास्तीची रक्कम मोजून खाजगी दुकानातून विज मिटर विकत घ्यावे लागत आहे, खाजगी दुकानात विज मिटर उपलब्ध आहे, व महावितरण कंपनी कडे मिटर नाहि हि बाब संशयित वाटते असे सामाजिक कार्यकर्ते दिपक मडावी यांनी म्हटले आहे
पुर्वी प्रमाणे सहमती पत्रावर मिटर देणे चालू न केल्यास, व विज मिटर मुबलक प्रमाणात कार्यालयात उपलब्ध न करुन दिल्यास महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा हि दिपक मडावी यांनी दिला