Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

गुरे चारायला गेला अन् परतलाच नाही #chandrapur #sindewahi


शोध मोहिमेनंतर घटनेचे वास्तव आले समोर
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील चिखमारा येथील रामदास नेताम हे जानावरे चारण्यासाठी तांबेगडी वनक्षेत्रात गेले होते. बरं हे काही त्यांच्यासाठी नवे नव्हते. आता पावसानेही उघडीप दिल्याने ते जनावरे चारण्यासाठी याच वनक्षेत्रात जात होते.
मात्र, शनिवारी सकाळी जनावरे घेऊन गेलेले रामदास हे रात्रीही परतलेच नाही. रात्री उशीरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबियांच्या मनात शंकेचे वादळ निर्माण झालेच पण त्यांनी कशीबशी रात्र काढली आणि रविवारी सकाळी शोध मोहिम सुरु झाली. तर तांबेगडी वनक्षेत्रातच त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.‌ पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत