Click Here...👇👇👇

'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रध्वज तिरंगा वितरित #chandrapur

Bhairav Diwase
1 minute read

चंद्रपूर:- 'हर घर तिरंगा' मोहिमेल मजबूती देण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहे. भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव प्रत्येक गावात, शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यासाठी 'आझादी का अमृत महोत्सव' कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत 'हर घर तिरंगा' अभियान सुरू आहे. 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्टपर्यंत सलग तीन दिवस राष्ट्रध्वज फडकवला जाईल.
याचीच जनजागृती करण्याकरिता सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा आयोजित "आजादी का अमृत महोत्सव" वर्षानिमित्त "हर घर तिरंगा" अभियान अंतर्गत आज बुधवार दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर यांच्या हस्ते महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना, प्राध्यापकांना, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना व उपस्थित विद्यार्थ्यांना भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा वितरित करण्यात आला.