Top News

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिक्षण मंच च्या उमेदवरांना भटके विमुक्तांच्या विविध संघटनांचा पाठिंबा #chandrapur


चंद्रपूर:- दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी होऊ घातलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या होऊ घातलेल्या सिनेट निवडणूकरीता नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातील भटके विमुक्त प्रर्वगातील अधिकृत उमेदवार गुरुदास कामडी यांच्यासह ओबीसी प्रा.धर्मेंद्र मुनघाटे, एस.सी. जयंत गौरकार,एस.
टी.योगिताताई पेंदाम,महिला राखीव किरण संजय गजपूरे यांना प्रथम पसंतीचे मतदान करावे तसेच खुल्या प्रर्वगातील प्रशांत दोंतुलवार, यश बांगडे,डॉ. सागर वझे,मनोज भूपाल यांना आपला पठिंबा जाहीर केला आहे.
विद्यापीठाच्या विकासाकरिता व विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच भटक्या विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यापीठात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी .गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये भटके विमुक्त प्रवर्गातील विविध संघटनांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद -शिक्षण मंच च्या अधिकृत उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठाच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन वाचा फोडलेली आहे विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यापीठाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी व भटके विमुक्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी आणि शिक्षणाचे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भटक्या विमुक्त समाजातील सर्व मतदारांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या सर्व उमेदवारांना पसंती क्रमांक (1) एकचं मतदान करावे असे आवाहन भाजप चंद्रपूर शहर जिल्हध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे भाजप भटके विमुक्तजिल्हा अध्यक्ष दिवाकरराव पुद्धटवार ,सुरेश केंद्रे,सुभाष राठोड,सुधीर जाधव,
राजेंद्र अडपेवार,अनिल पिट्टलवार,अजय बंडीवार,प्रदीप दासरवार,भटके विमुक्त विकास परिषदेचे प्रविण गिलबिले,अंबर खानेकर,दिलीप राठोड,हरी काळे,शरदराव गिरडे,लक्ष्मी पचारे,गणेश आकुलवार, चंद्रपूर जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष पांडुरंग गेडाम ,मनोहरराव शेन्डे,भोई समाज संघाचे डॉ. दिलीप शिवरकर,विजयराव घुगुसकार गडचिरोली सीताराम गेडाम आरमोरी,मनोहरराव गेडाम, अरुण सहारे
सिन्देवाही ,नामदेव मेश्राम
कृष्णा राऊत ,प्रफुल्ल राऊत सावली यांनी आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे.
या निवडणुकीकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या सर्व उमेदवारांना प्रथम पसंतीचे मतदान करून विजयी करावे असे आवाहन केलेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने