Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

पावसाने भिंत कोसळून वृद्धाचा मृत्यू #death


चंद्रपूर:- जिल्ह्यात संततधार पावसामुळे घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून एका वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव येथे घडली. रामचंद्र गायधने असे मृत वृध्दाचे नाव आहे.
पिंपळगाव भोसले येथील शिवाजी चौकात माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर गायधने यांचे घर आहे. सोमवारी रात्री त्यांनी सहकुटुंब जेवण केले. त्यानंतर त्यांचे वडील रामचंद्र गायधने हे झोपी गेले.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळल्याने रामचंद्र गायधने यांचा झोपेतच दबून मृत्यू झाला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना होताच. ते धावून आले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथील रूग्णालयात नेला. रामचंद्र गायधने यांच्या दुर्दैवी मृत्यूने पिंपळगावात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत