Top News

शेणगांव येथे निःशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

जिवती:- स्वातंत्र्याच्या अमृत महोस्तवाचे औचित्य साधतं अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे. याच निमित्ताने नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगांव येथे आचार्य विनोबा भावे सावंगी (मेघे) वर्धा, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगांव यांच्या सहकार्याने समता फाउंडेशन द्वारा निशुल्क मोतीबिंदू लेन्स, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोज बुधवार ला ला प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगांव येथे करण्यात आले आहे शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णाला त्यांच्या तपासणीनुसार  मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे)/ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा चा प्रवास राहण्याची व जेवणाची मोफत सोय करण्यात येईल, शिबिरात मोतीबिंदू आढलेल्या रुग्णांना ऑपरेशनची तारीख शिबिराच्या दिवशी दिली जाईल अशी माहिती एका प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे दिली असून परिसरातील जास्तीत जास्त रुग्णानी व गरजु नी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे व प्रा. आरोग्य केंद्र पाटण वैद्यकीय अधिकारी पाटण डॉ.कविता शर्मा, डॉ.छाया शेडमाके .प्रा.आ.केंद्र शेंगगाव वैद्यकीय अधिकारी डॉ.अबीद शेख डॉ.विद्या खानसोळे,व आरोग्यदूत स्वयंसेवक गोविंद गोरे यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने