अस्थी विसर्जनासाठी आलेल्या युवकाचा बुडून मृत्यू #death

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- घुग्घुस येथून जवळच असलेल्या वढा येथे अस्थी विर्सजनासाठी आलेल्या एका युवकाचा काल बुधवारी (१७ ऑगस्ट) रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. विशाल चौधरी (३०) रा. ताडाली कसे मृत युवकाचे नाव आहे.
घुग्घुस येथून जवळच असलेले वढा हे तीर्थक्षेत्र असून येथे त्रिवेणी संगमाची नदी आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील व परिसरातील अनेक नागरिक याठिकाणी अस्थी विसर्जनासाठी येतात. काल बुधवारी अस्थी विर्सजनासाठी काही नागरिक आले होते.
अस्थीविसर्जनानंतर आंघोळीसाठी मृतक विशाल चौधरी याचा मित्र पाण्यात उतरला होता. परंतु त्याला खोल भागातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तो पाण्यात बुडत असताना मित्राला वाचविण्यासाठी विशाल चौधरी याने प्रयत्न केले. मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात विशाल खोलगट भागातील पाण्यात बुडाला आणि त्याचा जीव गेला.
या घटनेची माहिती ठाणेदार बबन पुसाटे यांना मिळताच, सहा.पो.नि. संजय सिंग, मंगेश निरंजने, प्रफुल पिंपळकर हे घटनास्थळी दाखल झाले झाले. लगेच बचाव पथकास पाचरण करण्यात आले. बचाव पथकाने शोध मोहीम राबविली असता बचाव पथकास विशाल चौधरी या युवकाचा मृतदेह मिळाला.