वरोरा:- वरोरा तालुक्यातील चारगाव धरण येथे आज दुपारच्या सुमारास दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
बाहेर गावी शिकत असल्याने उद्याला पोळ्या निमित्याने कॉलेज ला सुट्ट्या लागल्या असल्याने आनंद घेण्यासाठी फिरण्याचा बेत घेऊन सर्व मित्र एकत्र येऊन चारगाव धरण येथे जाण्याचा बेत घेतला व इथे आले होते.
सदर धरणाचे मनमोहक दृश्य पाहून फोटो काढण्यात सुरुवात केली तेव्हा मृतक हार्दिक विनायक गुळघाणे राहणार शेगाव बू. हा सेल्फी काढण्याकरिता गेला असता पाय घसरून पाण्यात पडला. तेव्हा मृतक आयुष चीडे राहणार वरोरा हा त्याला वाचविण्याकरिता गेला असता तो सुद्धा पाण्यात पडला. तेव्हा या दोघाचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. पोलीसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्याकरिता उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले.