Top News

रासेयो अनुदान वितरणासाठी गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचचे कुलगुरूंना निवेदन #gadchiroli


गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाने सत्र 2021-22 चे राष्ट्रीय सेवा योजनेचे अनुदान त्वरीत वितरीत करावे, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचद्वारे कुलगुरूंना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोंडवाना विद्यापीठांतर्गत संलग्नित विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककांनी सत्र 2021-22 या सत्रात रा.से.यो.चे विविध नियमित व विशेष शिबिराचे उपक्रम राबविले आहेत. मात्र अजूनही 2021-22 या सत्राचे अनुदान महाविद्यालयांना वितरीत करण्यात आले नाही. त्यामुळे हे अनुदान त्वरित वितरीत करण्यात यावे. तसेच रा. तु. म. नागपूर विद्यापीठाच्या कालखंडात रा.से.यो.च्या नियमित व विशेष कार्यक्रमांच्या खर्चासाठी अग्रीम अनुदान वितरीत करण्यात येत होते.
मात्र गोंडवाना विद्यापीठाने अग्रिम देणे बंद केले आहे. ही बाब महाविद्यालयांवर अन्याय करणारी आहे. म्हणून सत्र 2022 - 23 पासून रा.से.यो. च्या नियमित व विशेष शिबिराचे खर्चासाठी अग्रीम अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंतीही संघटनेच्या वतीने निवेदनातून केली आहे. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन मा. कुलगुरूंनी दिले आहे. निवेदन देतांना गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचचे डॉ. परमानंद बावनकुळे, डॉ. धनराज खानोरकर, डॉ. रमेश सोनटक्के, डॉ. प्रकाश वट्टी, प्रा. प्रदीप चापले व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने