Top News

३० वर्षीय तरुणाची विष प्राशन करुन आत्महत्या #suicide


बल्लारपूर:- शहरातील दादाभाई नौरोजी वॉर्डातील सुभाषचंद्र बोस शाळेलगत राहणाऱ्या दिपक उर्फ गोलू बाबुराव कोठारे वय ३० वर्षे यांनी आपले राहते घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना दुपारी १:०० वाजता उघडकीस आल्याची माहीती आहे.
🌄
घरी कुणीच नसल्याची संधी पाहून घरी असलेले वासमोल नावाचे द्रव पदार्थ प्राशन केले या घटनेची माहीती परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी वेळ न दवळता संबंधित तरुणाला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दाखल केले. मात्र सदर युवकाच्या शरीरभर विष पसरल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाले.
🌄
सदर तरुण हा अविवाहित असून मागील काही वर्षांपूर्वी कंत्राटी स्वरूपात विज दिवे दुरुस्तीचे कार्य करीत होता. या घटनेची माहीती बल्लारपूर पोलिसांना कळताच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने