भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानं हे पद रिक्त झालं होतं. त्याजागी आता बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, आपल्या नियुक्तीनंतर बावनकुळे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपच्या संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाचं तसेच देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो की, त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली. या जबाबदारीतून पुढच्या काळात मला सर्वांना सोबत घेऊन भाजप जो महाराष्ट्रातील नंबर वन पक्ष आहे तो आणखी पुढे कसा नेता येईल तसेच शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा पोहोचवता येईल. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचंड ताकदीनं पक्ष उभा करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. मला जी जबाबदारी गेल्या २९ वर्षात पक्षानं दिली, तो विश्वास मी सार्थ करुन दाखवीन.