अज्ञाताकडून गोळी झाडून तरुणाची हत्या #murder

Bhairav Diwase

भामरागड:- अज्ञात इसमाने एका युवकाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे घडली. किशोर कुडयामी (वय २३) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी रात्री किशोर कुडयामी याची बहीण लघुशंकेसाठी उठली असता तिला घराबाहेर कुणीतरी बंदूक घेऊन उभा असल्याचे दिसले. तिने ही बाब किशोरला सांगितल्यानंतर तो टॉर्च घेऊन बाहेर आला. मात्र, काही क्षणातच त्याने किशोरवर गोळी झाडली. यात तो जागीच गतप्राण झाला. त्याची हत्या कुणी आणि कशासाठी केली. या हत्येत नक्षल्यांचा हात आहे किंवा कसे, याविषयीचा उलगडा पोलीस तपासानंतरच होईल. मात्र, या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.