Top News

विरूर स्टेशन पोलीस स्टेशन तर्फे चालण्याची व निबंध स्पर्धा संपन्न #Rajura

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा

राजुरा:- दिनांक १०/०८/२०२२ रोजी पोलीस स्टेशन, विरूर स्टेशन शांतता कमेटी विरूर व महिला दक्षता समिती विरूर तर्फे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमात अनेक मान्यवराची उपस्थिती होती.

सकाळी ०८:०० वा दरम्यान ७५ सौ मीटर चालण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर "हर घर तिरंगा" अभियान अंर्तगत तिरंगा रॅली काढण्यात आली. त्या रॅलीमध्ये इंदिरा महाविद्यालय विरूर, गुरूनानक शाळा विरूर, शिवाजी महाविद्यालय राजुरा चे शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांचा रॅलीत सहभाग होते. रॅलीदरम्यान शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील विद्यार्थी कडुन राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती व स्वच्छता बाबत पथनाट्य घेवून जनजागृती करण्यात आली.

पुरूष व महीला करीता ७५ सौ मीटर वॉकीथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत ५० वर्षीय पुरुष गटात प्रथम क्रमांक देवराव वासुदेव जिवतोडे रा. विरूर, व्दितीय क्रमांक मारोती झींगरू टेकाम रा. सिंधी, तृतीय क्रमांक मुर्लीधर हनमंतु बुजाडे रा. कोष्टाळा तसेच महीला गटात प्रथम क्रमांक श्वेता रविंद्र गोहणे रा. विरूर व्दितीय क्रमांक रत्नमाला मारोती उपरे रा. विरूर तृतीय क्रमांक वैष्णवी विठोबा खोबरे रा. विरूर यांनी पटकविला तसेच ' स्वातंत्र्यांची ७५ वर्ष या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. विविध वयोगटातील २०० निबंध प्राप्त झाले होते.

त्यामध्ये प्रथम क्रमांक तेजस्विनी नामदेव बोटरे, रा. शिवाजी आश्रम शाळा सुब्बई, व्दितीय क्रमांक तृष्टी रामा बाघाडे रा. चिंचोली, तृतीय क्रमांक कनिका इसरू कोटनाके रा. जि.प. शाळा सोंडो यांनी पटकविला त्यांना त्यांना रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

पोलीस स्टेशन विरूर हद्दीतील पोलीस पाटील उत्कृष्ठ कामगीरी करीता चिंचोली गावाचे पोलीस पाटील संतोष नेहारे यांना सन्मानचिनह शाल श्रीफळ देवून पुरस्कृत करण्यात आले. "हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत परीसरातील जनतेला "तिरंगा झेंडा" वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

सदर कार्यक्रम पोलीस स्टेशन विरूर, शांतता समिती विरूर, महीला दक्षता समिती विरूर यांनी सयुक्तीकरित्या यशस्वी केला. पोलीस स्टेशन विरूर चे ठाणेदार चव्हाण साहेब , पोलीस स्टेशनमधिल सर्व पोलीस अंमलदार यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने