पोंभुर्णा:- चिंतामणी महाविद्यालय पोभूर्णा येथे 15 आॕगस्टला मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पण या दिवशी पाऊस असल्यामुळे सर्व विद्यार्थी पावसाने ओलेचिंब व थरथरत आले त्यांना एक प्रश्न विचारला की तुमच्याकडे छञी नाही का? तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी नाही म्हटले. बस एवढेच कारण पुरेसे ठरले इतिहास विभाग प्रमुख प्रा.संजय उगेमुगे यांनी गोष्टीची नोंद घेतली व विद्यार्थ्यांना छञ्या वाटप करण्याचा निर्णय घेतला नंतर विद्यार्थ्यांना छञ्या आणून वितरीत करण्यात आल्या.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळाला.
चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा येथे छञ्या वाटप #umbrella
मंगळवार, ऑगस्ट २३, २०२२