Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

तरूणाची तलावात उडी घेऊन आत्महत्या #suicide

मुल:- यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हाती येणारे पीक शेतकऱ्यांना गमवावे लागले आहे. तोंडाशी आलेले धान पीक अतिवृष्टीमुळे वाहुन गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या तालुक्यातील गांगलवाडी येथील एका तरूण शेतकऱ्याने डोंगरगाव येथील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.
२२ ऑगस्टला ला रात्री घडलेली घटना २३ ऑगस्टला उघडकीस आली. मृतक शेतकऱ्याचे नाव संजय जनार्दन चिचघरे (३८) काल रात्री पानठेल्यावरून खर्रा खावुन येतो असे पत्नीला सांगुन गेल्यानंतर २३ ऑगस्टच्या सकाळ पर्यंत परत न आल्याने त्याची पत्नी आणि नातेवाईकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली.
दरम्यान गांगलवाडी पासुन जवळच असलेल्या डोंगरगाव तलावात कोणत्यातरी इसमाचे प्रेत तरंगत असल्याचे काही गावकऱ्यांना दिसले. काहींना ओळख पटल्याने सदर घटनेची माहिती संजयच्या घरच्यांना देण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून संजय चिंतेत असल्याचे सांगितले जाते. घटनास्थळी पोलिस दाखल होत पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत