Top News

विद्यार्थ्यांच्या महत्वाच्या प्रश्नांसाठी ABVP धडकली समाज कल्याण कार्यालयावर #chandrapur

चंद्रपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांची संपर्क साधल्यानंतर शिष्यवृत्ती व वस्तीगृह संदर्भातील काही गंभीर मुद्दे हे समोर आले होते याचीच दखल घेत अभाविप चंद्रपूर जिल्हाच्या वतीने समाज कल्याण अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार निदर्शने व विविध मागण्यांचे निवेदन सन्मा. अधिकारी यांना देण्यात आली.
शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षातील चंद्रपूर जिल्ह्यातील प्रामुख्याने OBC प्रवर्गातील शिष्यवृत्ती तसेच SC, ST, VJNT, SBC यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. त्या कारणामुळे महाविद्यालय विद्यार्थ्यांची ट्रान्स्फर प्रमाणपत्र (टीसी), पदवी प्रमाणपत्र तसेच महाविद्यालयात असलेले प्रमुख कागदपत्रे हे विद्यार्थ्यांना स्पष्ट नकार देत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक व पुढील शिक्षणाकरिता अडचणी येत आहे. त्यामुळे तात्काळ शिष्यवृत्ती खात्यात वर्ग करण्यात यावी.
जिल्हयातील वस्तीगृह व वस्तीगृह बाह्य विविध प्रवर्गातील विद्यार्थी यांची विद्यावेतन हे गेल्या दोन वर्षापासून थकीत आहे ते लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सुपूर्द करण्यात यावे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना नंतर परिस्थिती सामान्यता झालेली आहे त्याकरिता जिल्ह्यातील सर्व वस्तीगृह हे पूर्ववत करण्यात यावी तसेच या वस्तीगृहामध्ये भोजन व इतर अन्य सुविधा जसे ग्रंथालय, शैक्षणिक साहित्य, खेळण्याचे साहित्य व त्यातील सुविधा या पूर्ववत कराव्या. महाराष्ट्रातील दहावी व बारावी याचे निकाल लागलेले आहे तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर राज्यात शिकणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र याचे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे.

वरील विषयांवर तात्काळ सात दिवसात याचे निराकरण करून विद्यार्थी हितेशी निर्णय समाज कल्याण कार्यालयाने घेण्यात यावा अन्यथा विद्यार्थी परिषद अधिक आक्रमकपणे समाज कल्याण कार्यालयावर विद्यार्थी आक्रोश करेल असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार, सहसंयोजक जयेश भडघरे, कोश प्रमुख रोहित खेडेकर, पियुष बनकर, यश चौधरी, तन्मय बनकर, भूषण डफ, प्रकाश ठाकूर, कमलेश सहरे, मयूर भोकरे, अमोल मदने, वेदांत साकुरे, रितिक कनोजिया अमित पटले प्रवीण गिलबिले यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने