अवैध दारू विक्री विरोधात लिखीतवाड्यातील नागरिकांची पोलीस स्टेशनला धडक

Bhairav Diwase
गोंडपिपरी:- गोंडपिपरी पोलीस स्टेशनला लिखितवाडा येथील शेकडो नागरिकांनी धडक देत गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली.लिखीतवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू असून तात्काळ बंद व्हावी करिता ग्रामपंचायत ने ठराव घेऊन दारूविक्री करताना आढळल्यास १० हजार रु दंड करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला सोबतच पोलीस विभागाने कारवाया कराव्या मागणीला घेऊन गावातील बचत गटाच्या महिला, तंटामुक्त समिती,ग्रामपंचायत कमिटी संयुक्तरित्या पोलीस स्टेशनला धडक देऊन अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ठाणेदार जीवन राजगुरू यांना निवेदन दिले.  गावात दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी मागणीचे निवेदन ठाणेदारांना दिले.
 यावेळी सरपंच भाग्यश्री आदे, उपसरपंच हरीचंद्र मडावी, ग्रा.पं सदस्य कोमल फरकडे, प्रभाकर कोहपरे, माया कोहपरे, पुष्पां राऊत, प्रतिमा चंद्रगिरीवार या सदस्यांसह तं.मु.स अध्यक्ष पुरुषोत्तम नेवारे, हरीचंद्र वाढई, अमर बांगरे, प्रवीन ढुमने, दीपा मडावी, मायाबाई कोहपरे, संगीता धंदरे, जिजाबाई गावडे, यांच्यासह शेकडो गावकऱ्यांची उपस्थिती होती.