गोंडवाना विद्यापीठाने घेतला निर्णय #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase

शैक्षणिक सत्र २०२२-२३ करीता विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयांना व सर्व संबंधितांना सुचित करण्यात येते की, विद्यापीठाद्वारे निर्गमित अधिसुचना/जा.क्र./५८४ / २०२२ दिनांक २ ९ / ०८ / २०२२ नुसार विद्यापीठाचे पदव्युत्तर शैक्षणिक विभाग व संलग्नित महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची अंतीम दिनांक १५ / ० ९ / २०२२ होती. परंतू काही विद्यार्थी विहीत तारखेपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकले नाही व विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी सर्व प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक वेळापत्रकातील क्र. २ ( b ) च्या अधीन राहून मा. कुलगुरूंच्या परवानगीने दिनांक ३० / ० ९ / २०२२ पर्यंन्त महाविद्यालयात प्रवेश घेण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदर मुदतवाढ ज्या अभ्यासक्रमाचे प्रवेश केंन्द्रीय प्रवेश समितीद्वारे केले जातात त्यांना लागू राहणार नाही. निर्धारित प्रवेश क्षमतेमध्ये रिक्त जागी प्रवेश देण्यासाठी हि मुदतवाढ देण्यात येत आहेत.