शिक्षण परिषद अंतर्गत निरोप व सत्कार समारंभ संपन्न chandrapur gondpipari


भंगाराम तळोधी बिटातील शिक्षकांनी दिला स्नेहपूर्वक निरोप
गोंडपिपरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,धामणगाव येथे भंगाराम तळोधी बिटाची पहिली शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली.शिक्षण परिषदेमध्ये निपुण भारत,अध्ययन स्तर व भाषा,गणित,इंग्रजी विषयांच्या तासिका घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी व सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.
शिक्षण परिषदेच्या उत्तरार्धात भंगाराम तळोधी केंद्राचा व बिटाचा विविध उपक्रमातून नावलौकिक मिळविणारे केंद्राचे आधारवड सुनील मुत्यालवार आणि बिटाचे बिटविस्तार अधिकारी नामदेव राऊत तसेच सेवानिवृत्त उच्च श्रेणी मु.अ. गौतम खोब्रागडे,पदोन्नती मिळालेले छोटूभाऊ आवळे या सर्वांना आदरपूर्वक निरोप देण्यात आला.
निरोप व सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उदघाटक प.स.गोंडपीपरीचे गट विकास अधिकारी गजानन मुंडकर साहेब होते तर अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर साहेब होते.तसेच प्रमुख अतिथी म्हणून सुनील झाडे सरपंच वसंत फलके, शा.व्य.स.अध्यक्ष उपस्थित होते तसेच सत्कारमूर्ती देखील उपस्थित होते.या पूर्वी कार्यरत बिटातील व केंद्रातील शिक्षकांशी असलेला स्नेह अतूट राहावे. यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
प्रथमतः मुंडकर साहेब यांनी बिट विस्तार अधिकारी नामदेव राऊत साहेब आणि केंद्रप्रमुख सुनील मुत्यलवार यांचा सपत्नीक बिटातील शिक्षकांच्या वतीने करण्यात आला. त्यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, भेटवस्तू देण्यात आले. तसेच सेवापूर्ती सन्मान म्हणून गौतम खोब्रागडे तर पदोन्नती बाबत छोटुभाऊ आवळे यांना स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ देण्यात आले त्यानंतर गटविकास अधिकारी मुंडकर साहेब यांचे शाल,श्रीफळ देऊन स्वागत बिट विस्तार अधिकारी विलास रोहणकर यांनी केले तर भसारकर साहेब यांचे शाल,श्रीफळ देऊन स्वागत केंद्रप्रमुख दुशांत निमकर यांनी केले.
उदघाटनप्रसंगी बोलतांना आदरणीय मुंडकर साहेब यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी जागृती करण्याचे आवाहन केले.निरोप समारंभ प्रसंगी सुनील उईके,शीतल अकोजवार यांनी भरभरून कौतुक केले तसेच अश्वमेघा खोब्रागडे हिने विद्यार्थीहीत जोपासून अध्यापन करण्याचे सूतोवाच केले.सौ.जयश्री मुत्यलवार यांनी सुरेल गीतातून मनोगत,भावना व्यक्त केल्या.सत्कारमूर्ती यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी अधिक प्रमाणात मेहनत घ्यावी असे आवाहन केले.तुम्ही सदैव आमच्या आठवणीत राहणार असे बिटातील शिक्षकांना सांगितले तर अध्यक्षस्थानावरून भसारकर साहेब यांनी शिक्षण परिषद,अध्ययन स्तर निष्पत्ती याविषयी मार्गदर्शन केले.निरोप व सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन अश्रका कुमरे,आकाश झाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तानाजी अल्लीवार यांनी केले.निरोप व सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी बिटातील सर्व शिक्षकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावलेला आहे.त्यामुळे सर्व शिक्षकांचे विठ्ठलवाडा केंद्रातून परमानंद इंदोरकर,गौतम खोब्रागडे यांनी तर भं.तळोधी केंद्रातून आकाश झाडे,राजेश्वर अम्मावार,श्रावण गुंडेट्टीवार,निलेश मडावी,विठ्ठल गोंडे यांनी सहकार्य केले तसेच बिटातील सर्व शिक्षकांनी सहकार्य करून सत्कारमूर्तीला निरोप देऊन मिष्टान्न भोजन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत